आरती कसबे राहणार (पर्वती- पुणे ), पल्लवी बनसोडे राहणार (हडपसर- पुणे )व स्वाती दिघे राहणार (आंबेगाव-पुणे ) या तीन मुलींची लग्ने जानेवारीत ठाकरे सभागृहात मोफत तर आळंदी याठिकाणी अल्परकमेत होणार आहेत. कसबे यांचे घरात चार मुली,तर बनसोडे यांना तीन मुली व दिघे यांना दोन मुले आहेत.तिन्हीं मुलींचे वडील शरीरिक दृष्ट्या काही उद्योग करित नसल्याने कुटुंबाची परिस्थिती अत्यंत हलाखीची आहे.अशावेळी गुडविल इंडियाने सप्रे चॅरिटेबल ट्रस्ट , प्रीतम गंजेवार, सारंग राडकर व अतुल भाग्यवंत यांच्या मदतीने ' पूर्ण भांड्यांचा संसार ,मणीमंगळसूत्र , साडी,व लग्नातील चप्पलजोड ' अशा वस्तु या मुलींना भेट दिल्या. यावेळी प्रीतम गंजेवार, श्री अरुण भाग्यवंत व सौ .भाग्यवंत हजर होते . उपक्रमाची माहिती गुडवीलचे श्री. कालिदास मोरे यांनी दिली व कार्यक्रमाचे आयोजन सौ.संपदा अलाटे यानी केले.
पनामा फाउंडेशन व गुडविल इंडिया यांचे संयुक्त विद्यमाने दिनांक 25 व 26 तारखेला अंध, अपंग 125, भटके व विमुक्त 150 तर गरीब व निराधार 225 लोकांना कोथरूड, भावे स्कुल व कोपरे या निरनिराळ्या ठिकाणी मसाले भात, चपाती, भाजी व जिलेबी असे जेवण मोफत देण्यात आले. याप्रसंगी नगरसेवक श्री. योगेश मोकाटे, ऍड. सौ सुरेखा वाडकर, सौ. संपदा अलाटे व अपंग असो.चे हरीश सरडे व अमोल शिंगरे हजर होते. यावेळी नगरसेवक श्री योगेश मोकाटे व ऍड, सुरेखा वाडकर यांनी अपंगांना स्वतः ताटे भरून त्यांचे पर्यंत जेवण नेऊन दिले. व भाषणात दोन्ही संस्थांच्या कामाचे कौतुक केले. श्री.कालिदास मोरे यांनी अंध व अपंगांना खात्री दिली की आपल्या मधील 15 मुलींच्या लग्नात पूर्ण भांड्याचा संसार, साड्या व चप्पल भेट देण्यात येईल. या अगोदर 25 अंध व अपंग मुलींना त्यांचे लग्नात पूर्ण भांड्याचा संसार भेट देण्यात आला आहे.
गुडविल इंडियाचा कन्यारत्न विवाह मदत योजनेअंतर्गत कु. पूनम उत्तम मिसाळ या पितृ छत्र हरपलेल्या मुलीला संपूर्ण भांड्यांचा संच दि. 23/12/21 रोजी, उत्तमनगर येथील व्यावसायिक श्री. सुरेश भाग्यवंत यांचे हस्ते देण्यात आला. मुलीची आई सविता मिसाळ हीला एकूण दोन मुले असून लहान मुलगा दहावीला आहे. २००५ मध्ये मुलीचे वडील दारूच्या व्यसनामुळे वारले . त्यामुळे आईने धुणीभांडीचे कामे करून घरखर्च भागवला व आतापर्यंत कसाबसा उदरनिर्वाह केला. मुलीचे शिक्षण दहावीपर्यंत झाले असून तीही मुले सांभाळण्याचे काम करून आईला मदत करते . उत्तमनगर व्यावसायिक संघाचे अध्यक्ष , बालाजी वस्त्र भांडार याचे मालक श्री सारंग राडकर यांनी लग्नाप्रीत्यर्थ साडी भेट दिली तर अतुल भाग्यवंत यांनी लग्नाची चप्पल भावी वधूला भेट दिली. बालेघर, जि.सातारा येथे दि.28/12/2021 रोजी घरासमोर तिचा लग्नसोहळा पार पडणार आहे. याप्रसंगी सौ संपदा अलाटे व इतर महिलांनी भावी वधूचे औक्षण केले. कन्यारत्न योजनेत कोणालाही मदत करावयाची असल्यास खालील खात्यावर आर्थिक मदत पाठवावी. एका सेटसाठी रु. 6000/- खर्च येतो. MORE WELFARE TRUST BANK OF INDIA, UTTAM NAGAR BRANCH Current A/C NO: 061320110000793 ISFC CODE: BKID0000613 गुडविल तर्फे मुलीच्या भावी सुखी संसारासाठी अनंत आशीर्वाद व शुभेच्छा.🙏
· उशाला धोंडा आणि अंगावर आभाळ अशी अवस्था व त्यात कडाक्याची थंडी अशा गरिबांना गुडविल इंडियाने मायेचं उबदार ब्लॅंकेट्स,चादरी, शाल व स्वेटर्स देण्याचा उपक्रम सलग पाचव्या वर्षी सहकार आयुक्त व निबंधक सरकारी संस्था श्री.अनिल कवडे यांचे हस्ते झेंडा दाखवून उपक्रम साकार केला. पुण्यामधील पदपथावर म्हणजे उघड्यावर झोपणाऱ्या नागरिकांना श्री. अनिश मोरे यांचे मार्गदर्शनाखाली 500 ब्लॅंकेट, 250 चादरी व शॉल, 250 स्वेटर्स व त्या बरोबर चहा बिस्कीट देऊन सकाळी चार पर्यंत वाटप करण्याचे काम चालू होते. दरवर्षी हे वाटप होत असल्याने पदपथावरील लोक यावर्षीही आतुरतेने कपडे मिळण्याची वाट पाहून होते. हे वाटप रात्री 11 ते 4 या वेळेत करण्यात आले. या उपक्रमाची सुरुवात फर्ग्युसन कॉलेज पासून करून पुणे स्टेशनपर्यंत तर दुसऱ्या मार्गाने स्टेशन पासून डेक्कन पर्यंत करण्यात आली. या प्रसंगी गुडविलचे श्री. कालिदास मोरे, विवेक विप्रदास, ऍड. आशिष खैरे, सौ.रजनी मोरे, सौ.संपदा अलाटे उपस्थितीत होते. मध्यरात्रीच्या कडाक्याच्या थंडीत कुणीतरी येऊन नवीन उबदार ब्लॅंकेट अंगावर घालताहेत याचा आनंद या उघड्यावर झोपणारांना काही वेगळाच मिळाला. हा उपक्रम श्री. अनिल कवडे यांना खूप भावला. "निष्काम सेवाधर्म म्हणजे कुठल्याही फळाची अपेक्षा न बाळगता कर्म करीत राहणे. आणि गुडविल इंडियाचे कार्य या उक्तीला साजेसे आहे " असे उदगार श्री कवडे यांनी याप्रसंगी काढले. आपणही अशा उपक्रमात कपडे, धान्य आणि इतर मदत करून आपला सहभाग नोंदवू शकता.
· कॅनॉल वॉकिंग ट्रॅक, प्रभात रोड व कमला नेहरू पार्क या उच्चाभ्रू भागातील सकाळी चालणाऱ्यांच्या के. एन. पी. मस्त ग्रुपने सामाजिक बांधिलकी जपत 300 ब्लॅंकेट्स, 100 स्वेटर्स, 750 नको असलेले कपडे, भांडी, धान्य, चप्पल, शूज इ. राहिवास्यांकडून गोळा करून किंवा स्वतः आणून ते पुढे गरजू लोकांना देण्यासाठी गुडविल इंडिया कडे सुपूर्त केले. हा मस्त ग्रुप गेले तीन वर्षांपासून सातत्याने कपडे, धान्य इ गोळा करून ते गुडविलला देऊन सामाजिक बांधीलकी जपत आहे. मस्त ग्रुप दरवर्षी वृक्षारोपण, 26 जानेवारी व 15 ऑगस्टला ध्वजवंदना, दर वर्षी दिवाळी व होळी साजरी करणे असे अनेक समाजपयोगी कामे करीत असतात. गेली कित्येक वर्ष ते पर्यवरणास घातक असलेल्या वस्तू गोळा करून पर्यावरण संवर्धनाचे काम करीत आहेत. याप्रसंगी श्री. बाळासाहेब गांजवे यांनी सांगितले की "समाजाला नको असलेल्या वस्तू रोड वर किंवा कचरा कुंडीत पडण्या अगोदर आम्ही लोकांचे कडून गोळा करून त्या गरजूंना देऊन परत वापरात आणणार आहोत". त्यासाठी अनेक ठिकाणी वस्तू गोळा करण्याचा कार्यक्रम राबवणार आहोत. त्याचा एक भाग म्हणजे 14 जानेवारी 2022 रोजी संक्रातीचे दिवशी परत एकदा हाच पर्यावरण पूरक कार्यक्रम प्रभात रोड या भागात आयोजित केला आहे.
· वडीलांचे छत्र नसलेल्या मुलीच्या भावी संसारासाठी केली गुडविलने मदत गुडविल इंडियाचा कन्यारत्न विवाह मदत योजनेअंतर्गत एका असहाय मुलीला संपूर्ण भांड्यांचा संच दि. 20/12/21 रोजी, कोंढवे धावडे येथील जेष्ठ समाजसेवक श्री. सोपान दामगुडे यांचे हस्ते देण्यात आला.मुलीची आई संगीत हीला एकूण दोन मुले ही मुले लहान असताना वडील दारूच्या व्यसनामुळे कुटुंबाला कायमचे सोडून निघून गेले. त्यामुळे आईने भंगार गोळा करून घरखर्च भागवला व आतापर्यंत कसाबसा उदरनिर्वाह केला. हे कुटुंब न्यू कोपरेगाव येथील रहिवासी असून कोपरे येथे दि.24/12/2021 रोजी घरासमोर तिचा लग्नसोहळा पार पडणार आहे. याप्रसंगी गुडविल तर्फे संपूर्ण भांड्यांचा संच, लग्नाची साडी व एक बॅग या मुलीला भेट देण्यात आली.मुलीची आर्थिक परिस्थिती बघता श्री. दामगुडे यांनी लग्नाकरिता 50 किलो तांदूळ भेट जाहीर केला. श्री दामगुडे दरवर्षी गुडविल मार्फत एका मुलीच्या भांडी संसारासाठी मदत करीत असतात. गुडविल तर्फे मुलीच्या भावी सुखी संसारासाठी अनंत आशीर्वाद व शुभेच्छा.
· गुडविल इंडिया व कै.स्व. बबनराव मनेरे प्रतिष्ठान तर्फे कु.उमा साठे रा. वारजे,रामनगर व कु. प्रीती पाटोळे रा.भूमकर वस्ती, वाकड यांना स्वयंपाक घरातील पूर्ण भांड्याचा सेट व साडी कन्यारत्न विवाह मदत योजने अंतर्गत भेट देण्यात आली. कु. उमा हीचे वडील पॅरॅलीसस मुळे घरीच असतात व आई धुण्याभांड्याचे काम करून घर चालविते. तर कु. प्रीती हिचे आई- वडील बिगारी काम करून दोन मुलगे व दोन मुलींचा असा प्रपंच अत्यंत कठीण आर्थिक परिस्थितीत चालवितात. अशा अत्यंत गरजू दोन मुलींना हे सेट भेट देण्यात आले. याप्रसंगी बांधकाम व्यावसायिक श्री.दशरथ मणेरे, संजय कामठे, सौ.सुनीता डांगे, कल्पना बेनकर, संगीता चव्हाण व गुडविल इंडियातर्फे कालिदास मोरे व सौ. संपदा अलाटे हजर होत्या. या प्रसंगी मनेरे यांनी बारा मुलींसाठी भांड्याच्या सेटला आर्थिक मदत जाहीर केली. आपल्या नजरेत कोणी अत्यंत गरीब घरच्या मुलीचे लग्न असेल तर गुडविल इंडियाला मदतीसाठी जरूर संपर्क करावा. संपर्कासाठी क्रमांक :- 020-25290909/ 9011013330
· गुडविल तर्फे तीन मुलींना लग्नात भांड्याचा सेट व साडी भेट गुडविल इंडियाच्या कन्यारत्न विवाह मदत योजने अंतर्गत तीन अत्यंत गरजू मुलींना प्रसिद्ध उद्योगपती श्री राजू धावडे यांच्या हस्ते संपूर्ण भांड्यांचा संसार,लग्नाची साडी व प्रवासी बॅग भेट देण्यात आली. या मुली कु. सुवर्णा दिनकर पोळेकर ,शिवणे , कु. विद्या रेवणसिद्ध देसाई, पुणे व कु सपना दिगंबर खैराल, डोणजे या ठिकाणच्या रहाणाऱ्या असून त्यांना लग्नाप्रीत्यर्थ प्रत्येकी र.5000/- किमती पर्यंतच्या वस्तूंची भेट देण्यात आली. कु सुवर्णा ही अनाथ असून तिच्या काकांनी तीचा सांभाळ केला. कु. विद्या हिचे आई वडील सोसायटी मध्ये गाड्या धुण्याचे काम करून हालाखीच्या परिस्थितीतही मुलीला एम. कॉम पर्यंत शिक्षण शिकविले. तर कु. सपना हिचे वडील पेट्रोल पंपावर साफ सफाईचे काम करतात. संस्थापक श्री कालिदास मोरे यांनी मुलींना भावी आयुष्यासाठी शुभेच्छा देऊन आतापर्यंत याप्रकारे पाचशे मुलींना मदत करण्यात आली भविष्यात ही संख्या एक हजार पर्यंत नेण्याचा संकल्प स्पष्ट केला. सौ. संपदा अलाटे व श्री रमेश चांदेकर यांनी उपस्थितांचे आभार मानले.
· द स्पायर्स को-ऑप- हौसिंग सोसायटी प्रायव्हेट लिमिटेड तर्फे गुडविल इंडियाला जुने कपडे , धान्य, खेळणी व आर्थिक स्वरूपात मदत . दिनांक १४ नोव्हेंबर २०२१ रोजी अभिनव दुबे यांच्या सहकार्यामुळे सोसायटी मध्ये कलेक्शन करण्यात आले. यामध्ये जुने कपडे ,धान्य , खेळणी इत्यादी स्वरूपात मदत मिळाली. श्रीमती नंदा मामीडवार यांनी त्यांच्या वाढदिवसा निमित्त संस्थेला ७००० रुपयांची आर्थिक मदत केली . याप्रसंगी गुडविल इंडिया तर्फे प्रमाणपत्र देऊन त्यांचा सत्कार करण्यात आला. अशा प्रकारे गुडविल इंडियातर्फे गरजुंना मदतीचा हातभार लागला. लग्न, समारंभ ,वाढदिवस किंवा कोणत्याही शुभकार्यानिमित्त आपण गुडविल संस्थेला जुन्या वस्तूंचे दान करू शकता. आपली मदत इतरांसाठी बहुमूल्य ठरू शकते.गेल्या १० वर्षांपासून कित्येक परिवार आपल्या मदतीमुळे चांगल्या वस्तूंचा उपभोग घेत आहेत.आपण जुन्या वस्तूचे दान करूनही परमार्थ साधू शकता. गुडविलचा स्टाफ संपूर्ण सुरक्षिततेसह आपल्याकडे येऊन कलेक्शन घेऊन येईल. संपर्कासाठी क्रमांक :-०२०-२५२९०९०९ ९०११०१३३३०
· गुडविल इंडियाने करिष्मा सोसायटी मधील सेक्युरिटी व हाऊस किपिंग स्टाफला शर्ट, पॅन्ट व साड्या यांचे वाटप केले. हा उपक्रम गेल्या दोन वर्षांपासून राबविला जात आहे. सोसायटी तर्फे त्यांना मिठाई व आर्थिक मदत दिली जाणार आहे. याप्रसंगी श्री रोहिदास मोरे, श्री कालिदास मोरे, श्री अभिजित मोरे ,सौ.स्वाती पाटील उपस्थित होते.
· स्वप्नशिल्प सो.मधील स्टाफला गुडविल इंडिया तर्फे दिवाळी भेट प्रत्येकाला वाटते आपल्या बायका-मुलांसोबत दिवाळी आनंदात साजरी करावी. मुलांना नवीन कपडे मिठाई किंवा वस्तू द्याव्यात. परंतु या महागाईच्या दिवसात अत्यल्प उत्पन्न असलेल्या कुटुंबांना दैनंदिन खर्च भागविणेच अवघड असते तर दिवाळीत कसे खर्च भागविणार. अशा वेळी गुडविल इंडियाने स्वप्नशिल्प सोसायटी मधील सेक्युरिटी व हाऊस किपिंग स्टाफला शर्ट, पॅन्ट, साड्या व रंगीत पणत्यांचे वाटप केले. हा उपक्रम गेल्या दोन वर्षांपासून राबविला जात आहे. सोसायटी तर्फे त्यांना मिठाई व आर्थिक मदत दिली जाणार आहे. याप्रसंगी कालिदास मोरे, सौ.संपदा अलाटे व सोसाटीचे माजी अध्यक्ष सुभाष झानपुरे, श्रीनिवास मेहेंदळे व अशोक जाधव उपस्थित होते.
· On an Auspicious occasion of Ganesh Festival, members of Ramana Srushti Society ,Narhegaon organized one Donation Drive at the Premises of Society. It has been handed over to Goodwill India for further Distribution to Tribal and Rural Area. Goodwill Team “Chetan Darwatkar and Vishwajeet Bhalerao” Handed over the Certificate of Appreciation to Society members towards their Noble cause.
· Books Donation Drive by Goodwill India for Sadguru Seva Pratishthan Mr. Sachin Mhase's Sadguru Seva Pratishthan is working in Pune. In the concept of 'Gaon Tithe Vachanalaya', libraries are started in different villages, and English and Marathi books are given to them. The purpose is to increase the interest of society in reading. Goodwill India has a lot of books in its collection. The collected books were handed over to Shri. Sachin Mhase by the Officer of Hindusthan Petroleum Shree Mangesh Dongre.
गरजू मुलींना लग्नात भांड्यांचा संसार भेट गुडविल इंडिया तर्फे भोर तालुक्यातील अत्यंत दुर्गम भागातील कु.भारती धानवले, कु.निर्मला जाधव व् हडपसर ची कु. विशाखा शिंदे यांना त्यांचे लग्नात सौ.तृप्ती देसाई, डॉ . सौ. रुपा अग्रवाल व् शिवचरित्र व्याख्याते श्री. दादासाहेब कोरेकर यांचे हस्ते पूर्ण भांड्यांचा संसार (झाल) भेट देण्यात आला.
शुक्रवार दि.10/06/2016 रोजी गुडविल इंडिया तर्फे खडकवासल्याच्या सामाजिक कार्यकर्त्या व विशेष कार्यकारी अधिकारी सौ. सुचित्रा नानगुडे यांच्या हस्ते कु. सिध्दी अरविंद साबळे (रा. खडकवासला, ता. हवेली ,जि. पुणे ) या गरीब कुटुंबातील मुलीस तिच्या लग्ना प्रीत्यर्थ सम्पूर्ण भांडयांचा संसार (झाल) भेट देण्यात आला
अभिनेते विजय पाटकर यांचे हस्ते मुलींना भांड्यांचा संसार भेट. गुडविल इंडिया गेली चार वर्षे राबवत असलेली कपडे वाटप योजना , कन्यारत्न विवाह मदत योजना , संगणक वाटप इत्यादी योजनांची माहीती प्रसिध्द अभिनेते विजय पाटकर यांनी घेतल्यानंतर मलाही आता तीव्रतेने सामाजिक काम करावयाची इच्छा होत आहे , असे विचार व्यक्त केले.
अभिनेते विजय पाटकर यांचे हस्ते मुलींना भांड्यांचा संसार भेट. गुडविल इंडिया गेली चार वर्षे राबवत असलेली कपडे वाटप योजना , कन्यारत्न विवाह मदत योजना , संगणक वाटप इत्यादी योजनांची माहीती प्रसिध्द अभिनेते विजय पाटकर यांनी घेतल्यानंतर मलाही आता तीव्रतेने सामाजिक काम करावयाची इच्छा होत आहे , असे विचार व्यक्त केले.
महावस्रदान अभियानायामध्ये सुमारे तीन लाख कपडे जमा. गुडविल इंडिया आणि महाराष्ट्र कॉस्मोपोलिटन एज्युकेशन सोसायटी , पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने जुन्या कपड्यांचे कलेक्शन करून गरजूंना दान करण्याकरिता "महावस्रदान अभियान " राबविण्यात आले .यामध्ये नागरिकांकडून सुमारे तीन लाख कपड्यांचे कलेक्शन करण्यात आले. लवकरच या उपक्रमाची नोंद गिनिज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड मध्ये होणार आहे.
महावस्रदान अभियानायामध्ये सुमारे तीन लाख कपडे जमा. गुडविल इंडिया आणि महाराष्ट्र कॉस्मोपोलिटन एज्युकेशन सोसायटी , पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने जुन्या कपड्यांचे कलेक्शन करून गरजूंना दान करण्याकरिता "महावस्रदान अभियान " राबविण्यात आले .यामध्ये नागरिकांकडून सुमारे तीन लाख कपड्यांचे कलेक्शन करण्यात आले. लवकरच या उपक्रमाची नोंद गिनिज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड मध्ये होणार आहे.
गुडविल इंडियाच्या कन्यारत्न विवाह मदत योजनेअंतर्गत 14 जानेवारी रोजी कु.निकिता सुपेकर रा. खिलारेवाडी कोथरूड या गरीब कुटुंबातील मुलीला तिच्या लग्नामध्ये संपूर्ण भांड्याचा संसार (झाल) एनरव्हील क्लब प्लॅटिनम ग्रुपच्या अध्यक्षा काविताताई शिवराईकर व कोथरूड मतदार संघातील राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष मा. श्री. गणेशभाऊ माथवड यांच्या हस्ते भेट देण्यात आला.
कन्यारत्न विवाह मदत योजनेच्या आवाहनाला प्रतिसाद म्हणून दि.11/01/2016 रोजी इनरविल क्लबच्या पुणे प्लॅटिनम ग्रुपने दोन मुलींना भांड्याचा संसार ( झाल ) देण्यासाठी रु.10,001/- चा चेक गुडविल इंडियाचे संस्थापक श्री. कालिदास मोरे यांच्याकडे सुपूर्त केला. या प्रसंगी प्लॅटिनम ग्रुपच्या सौ. परब मॅडम व त्यांच्या वीस सहकारी महिला उपस्थित होत्या. त्यांच्या या मदतीबद्दल गुडविल इंडिया आभारी आहे.
कोथरूड प्लस या पाक्षिकामधून बातमीद्वारे जुन्या कपड्यांचे दान । गरिबांसाठी वरदान।। अशी साद घालत गुडविल इंडिया तर्फे रवि. दि.17/01/2016 रोजी कोथरूड येथील यशवंतराव चव्हाण नाट्यगृहाच्या प्रवेशद्वाराशेजारी कपडे कलेक्शन कॅम्प चे आयोजन करण्यात आले होते . या कॅम्प ला प्रतिसाद म्हणून अनेक नागरिकांनी भरपूर कपडे आणून दिले . या सर्व नागरिकांचे व कोथरूड प्लस चे गुडविल इंडिया तर्फे मनःपूर्वक आभार...
गुडविल इंडिया या सामाजिक उपक्रमात कार्यरत असलेली पूर्ण टीमची स्नेह सहल दिनांक आठ जानेवारी रोजी प्रती शिर्डी, कार्ले लेणी व् महड़ गणपती साठी आयोजित केली होती. यामध्ये पस्तीस महिला व् पंधरा पुरुषानी भाग घेतला होता. याप्रसंगी यूनिवर्सल कॉलेजचे श्री एस पी देशमुख यांनी काहीही शुल्क न लावता त्यांचे कॉलेजची बस उपलब्ध करून दिली होती.
गुडविल इंडीयाच्या कन्यारत्न विवाह मदत योजनेअंतर्गत किष्किंदानगर वसाहत ,कोथरूड येथे वास्तव्यास असलेल्या हनवते कुटुंबातील कु.कोमल नागनाथ हनवते या मुलीच्या विवाहपित्यर्थ संपूर्ण भांड्याची झाल संस्थेचे संस्थापक श्री. कालिदास मोरे यांच्या हस्ते प्रदान करण्यात आली याप्रसंगी आमच्या कुुटूंबातील मुलींच्या लग्नात भांड्याचा संसार देऊन गुडविल इंडियाने मोलाचा हातभार लावला आहे . असे उदगार कुटुंबाची जबाबदारी असलेल्या कोमलच्या आईने व्यक्त केले.
गुडविल इंडियाच्या कन्यारत्न विवाह मदत योजने अंतर्गत दोन गरजू मुलींना कु. पौर्णिमा सोनवणे व लक्ष्मी सोनकांबळे यांचे या महिन्यात होणाऱ्या लग्नात पूर्ण भांड्यांचा संसार ( झाल) भेट देण्यात आला. याप्रसंगी उद्योजक व सामाजिक कार्यकर्ते श्री. अमित तोडकर आणि श्री प्रशांत रोकडे हजर होते . त्यांच्या हस्तेच भांड्याची झाल प्रदान करण्यात आली या प्रसंगी गूडविल इंडियाचे श्री कालीदास मोरे यांनी त्यांच्या सामाजिक कामाची सविस्तर माहिती दिली. श्री. मदन धायरे यांनी सूत्रसंचालन केले.
गुडविल इंडियाच्या कन्यारत्न विवाह मदत योजने अंतर्गत चार गरजू मुलींना कु. स्वाती देवकुळे,रेश्मा कोळेकर, रुपाली कुलथे व् अर्चना आदमाने यांचे या महिन्यात होणाऱ्या लग्नात पूर्ण भांड्यांचा संसार ( झाल) भेट देण्यात आली. याप्रसंगी शिवणे गावचे माजी आदर्श सरपंच श्री. रामदास दांगट, शिवसेना शाखा प्रमुख श्री अजय आड़कर, श्री विजय मोरे व् श्री बगाटे हज़र होते. या प्रसंगी गूडविल इंडियाचे श्री मोरे यांनी त्यांच्या सामाजिक कामाची सविस्तर माहिती दिली. श्री. मदन धायरे यांनी सूत्रसंचालन केले
Tribal families from village Aundhe, Taluka Vikramgadh Dist. Palghar on Mumbai Ahmedabad highway were given 1000 used Clothes on behalf of Goodwill India and food grains, soaps, onion, potatoes were given on behalf of Akhil Bharatiya Marathi Chitrapat Mahasangh. Actor Shri. Vijay Patkar, Actress Hemlata Bane and Ruchita Patil, Kalidas More, Aneesh More on the desk.
आझम कैंप , पुणे व गुडविल इंडिया उपक्रम पुणे यांच्या संयुकत विद्यमाने Give For Pune या उपक्रमांतर्गत महावस्त्रदान अभियान आयोजित केले आहे. या उपक्रमाची अधिकृत घोषणा करण्यासाठी नुकतीच पुणे येथे पत्रकार परिषद संपन्न झाली. या प्रसंगी इनामदार कॉलेजचे प्रिंसिपल ऋषि आचार्य व गुडविल इंडियाचे संस्थापक कालिदास मोरे यांनी पत्रकार परिषदेत वरील उपक्रमाची माहिती दिली.
डिवाइन जैन ग्रुप यांच्या प्रयत्नाने मुकुंद नगर मधील सुजय गार्डन सोसायटी येथे जुने कपडे कलेक्शन कैंप यशस्वी झाला. यासाठी श्री केतन शहा व श्री संकेत शहा यांनी विशेष प्रयत्न केले या प्रसंगी गुडविल इंडिया चे संस्थापक श्री कालिदास मोरे यांनी डिवाइन ग्रुप च्या 200 तरुण कार्यकर्त्यांना समाजिक उपक्रमा संबंधी मार्गदर्शन केले.
Outstanding Achievement Award For Social Services was given at the hands of CBI Ex Chief Director of India Shri. Joginder Singh, Delhi Social Welfare Minster Shri. Sandeep Kumar, Ex Chief Election Commissioner of India Dr. Krishnmurti, Ex Governor of Tamilnadu & Ex Central Minister Shri Bhishm Narayan Sing, Ex Chief Justice of India Shri O P Verma. All these were the Chief Guest for the function
पदमभूषण डॉ विजय भाटकर ज्यांनी परम सुपर कॉम्पुटर 8000 बनविला. त्यानंतर परम सुपर कम्प्यूटर 10000 बनविला अशा व्यक्तीला भेटण्याचा योग आम्हाला मिळाला खुप आनंद वाटला. ते वेळ नसतानाही गुडविल इंडिया उपक्रमाची माहिती व क्लिप्स पाहण्यासाठी एक तास दिला. व् 15 ऑगस्ट ला शिवणे याठिकाणी वर्कशॉप ला भेट देईल अशी त्यांनी खात्री दिली.
कॉंग्रेस् चे पुरन्दर तालुक्यातील जेष्ठ नेते व् माजी आमदार श्री. चंदुकाका जगताप यांनी गुडविल इंडिया ला भेट देऊन कपडे वाटप व् मुलींच्या लग्नात भांडी भेट देत असलेल्या कामाचे कौतुक केले. आपण दर सोमवारी सासवड ला कपडे वाटप करता तसेच जेजुरीला देखील करावे असे सुचविले. त्यासाठी आवश्यक ती सर्व मदत आम्ही करू असे सांगितले. त्यांचे हस्ते कु पूजा शिंदे रा. कोथरूड या मुलीला भांड्याचा संसार भेट देण्यात आला
कॉंग्रेस् चे पुरन्दर तालुक्यातील जेष्ठ नेते व् माजी आमदार श्री. चंदुकाका जगताप यांनी गुडविल इंडिया ला भेट देऊन कपडे वाटप व् मुलींच्या लग्नात भांडी भेट देत असलेल्या कामाचे कौतुक केले. आपण दर सोमवारी सासवड ला कपडे वाटप करता तसेच जेजुरीला देखील करावे असे सुचविले. त्यासाठी आवश्यक ती सर्व मदत आम्ही करू असे सांगितले. त्यांचे हस्ते कु पूजा शिंदे रा. कोथरूड या मुलीला भांड्याचा संसार भेट देण्यात आला